top of page


या संघटनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे :
१) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे.
२) हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टींमधून अध्यात्म आणि विज्ञान याचा संबंध नवीन पिढीसमोर मांडणे.
३) राष्ट्रावर जेव्हा संकट येईल तेव्हा जनतेसाठी शक्य तेवढी मदत करण्यासाठी तत्पर असणे.
४) सर्व समाजातील मुला-मुलींना नोकरी, व्यवसायामध्ये उभे करून सक्षम होण्यास सहकार्य करणे.
५) मराठी आणि संस्कृत भाषा आणि त्यातील शब्दकोश नवीन पिढीपर्यंत पोहोचवून मराठी तसेच संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे.
६) निराधार, वृध्द व्यक्तींना गरज पडेल तेथे सहाकार्य करणे.
७) पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण, वृक्षारोपण असे उपक्रम राबवणे.
८) रक्तदान, श्रमदान, स्वच्छता अभियान मोहीम राबवणे.
९) समाज बांधिलकीची जाणीव ठेवून अनाथ व गोर-गरिबांच्या मुलांसाठी मदत करणे..
१०) प्रत्येकाला राष्ट्र सेवेसाठी प्रेरित करून त्यात सामिल करून घेणे.
वरील उद्दिष्टांसाठी संघटनेतील सर्व सदस्य झटून काम करतील. संघटनेचे सध्या काम पुणे जिल्ह्यात सुरू आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जिल्ह्यात संघटनेचे काम पोहोचवून सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा मानस आहे.
संस्थेचे उपक्रम
संस्थेचे विश्वस्त मंडळ

"देहा कडून देवा कडे जाताना मध्ये देश लागतो, आणि मी त्याच देणं लागतो"
bottom of page